बुलेट ट्रेन प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा पार; नद्यांवर उभारला ३०० किमीचा पूल
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाने ३०० किमी व्हायाडक्टचे काम पूर्ण केले आहे, अशी घोषणा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. या प्रकल्पात गुजरातमधील सहा नद्यांवर व्हायाडक्ट बांधण्यात आले आहेत. वलसाडमध्ये ३५० मीटर बोगदा आणि सुरतमध्ये ७० मीटर स्टील पूल बांधण्यात आले आहेत. २०१७ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी या प्रकल्पाची पायाभरणी केली होती.