‘आप’ नेत्यानंच पत्नीच्या हत्येसाठी पाठवले होते भाडोत्री हल्लेखोर, नंतर दरोड्याचा केला बनाव
पंजाबच्या लुधियानातील आप नेता अनोख मित्तल आणि त्याची पत्नी मानवी उर्फ लिप्सी यांच्यावर दरोडेखोरांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात लिप्सीचा मृत्यू झाला. मात्र, तपासात उघड झालं की अनोख मित्तलनंच पत्नीच्या हत्येसाठी हल्लेखोरांना पैसे दिले होते. अनोखचे प्रतिक्षाशी विवाहबाह्य संबंध होते आणि लिप्सीला याचा सुगावा लागला होता. पोलिसांनी अनोखसह चार जणांना अटक केली आहे.