“अजून कायदेशीर प्रक्रिया संपली नाही…” केजरीवाल यांच्या सुटकेनंतर भाजप नेते काय म्हणाले?
दिल्लीतील कनिष्ठ न्यायालयाने पुराव्याअभावी अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण प्रकरणातून निर्दोष मुक्त केल्यानंतर भाजप नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या. भाजप नेते सुधांशु त्रिवेदी आणि अमित मालवीय यांनी न्यायालयीन प्रक्रिया अद्याप संपलेली नसल्याचे सांगितले. मालवीय यांनी केजरीवाल यांच्या धोरणांवर टीका केली. केजरीवालांनी निर्दोष मुक्ततेनंतर सत्याचा विजय झाल्याचे सांगितले.