“पहाटे साडेतीन वाजता वडिलांना फोन का करायला लावला?” अभिजीत दिपकेंचा पलटवार
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांना कोठडीत फोन वापरू दिला नाही आणि वकिलाशी संपर्क साधू दिला नाही, असे त्यांनी म्हटले. त्यांच्या आजीच्या निधनानंतरही पोलिसांनी सहकार्य केले नाही, असा आरोप आहे. दिल्ली पोलिसांनी हे आरोप फेटाळले असून, दिपके यांना सर्वतोपरी सहकार्य केले असल्याचे व्हिडीओद्वारे दाखवले आहे.