‘तुम्ही कुठे आहात?’, सौरव दास, आशुतोष रांका यांच्यावर जेव्हा अभिजीत दिपके संतापले होते
२० जुलै रोजी दिल्लीच्या जंतर-मंतर येथून संसदेवर काढलेल्या मोर्चात आशुतोष रांका आणि सौरव दास अनुपस्थित राहिल्यामुळे अभिजीत दिपके एकटेच मोर्चाचे नेतृत्व करत होते. उपोषणामुळे दिपके अशक्त झाले होते आणि मोर्चाचे नेतृत्व करणे कठीण झाले होते. यामुळे आपण संतापलो होतो, अशी आठवण दिपके यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितली.