सौरव दास, आशुतोष रांकांच्या अटकेनंतर अभिजीत दिपके आक्रमक; दिल्लीत ‘तिरंगा मोर्चा’ची घोषणा
केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत कॉक्रोच जनता पार्टी दिल्लीत आंदोलन करत आहेत. या आंदोलनादरम्यान सीजेपीचे सौरव दास आणि आशुतोष रांका यांना अटक करण्यात आली. यावर सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी १६ ऑक्टोबरला तिरंगा मोर्चाची घोषणा केली. दिल्लीतील सेंट्रल पार्क कनॉट प्लेस या ठिकाणी १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता तिरंगा मोर्चा काढण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.