“सप्तपदीच्या अभावापोटी विवाह बेकायदेशीर होत नाही!” हिंदू विवाहावर हायकोर्टाचं भाष्य
दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत लग्नात सप्तपदीचा विधी झाला नाही म्हणून ते लग्न अवैध ठरत नाही, असे स्पष्ट केले आहे. न्यायालयाने नमूद केले की जोडप्याने काही विधी पार पाडल्यानंतर एकत्र राहण्यास सुरुवात केली आणि त्यांना अपत्य झाले असल्यास लग्न अवैध ठरवता येणार नाही. हिंदू विवाह कायदा १९५५ नुसार सप्तपदी हा पारंपरिक विधी बंधनकारक नाही.