ऑनलाईन अश्लीलतेवर केंद्राकडून निर्बंध? तुरुंगवासाचीही तरतूद; वाचा मुद्द्यांची यादी
ऑनलाईन विश्वात योग्य माहितीबरोबरच चुकीच्या माहितीचाही मोठा साठा आहे, ज्यामुळे अल्पवयीन मुलांना धोका आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्र सरकारने अशा मजकुरावर निर्बंध आणण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. यामध्ये अश्लीलता पसरवणाऱ्या मजकुरावर तुरुंगवास व आर्थिक दंडाची तरतूद आहे. प्रस्तावित नियमावलीत धार्मिक, सामाजिक द्वेष पसरवणाऱ्या मजकुराचाही समावेश होऊ शकतो.