‘MAYDAY’… अहमदाबादमध्ये विमान कोसळण्याच्या काही क्षण आधी वैमानिकाचा संदेश!
अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळल्यामुळे भीषण दुर्घटना घडली आहे. विमानात २४२ प्रवासी, २ वैमानिक आणि १० केबिन क्रू मेंबर्स होते. वैमानिक कॅप्टन सुमीत सभरवाल यांनी एटीसीला "MAYDAY" संदेश पाठवला होता. विमानात १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, ७ पोर्तुगीज आणि १ कॅनडाचा नागरिक होते. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून बचावकार्य सुरू आहे.