अमिताभ बच्चन यांच्या पोस्टमुळे इराणमधील १३४ वर्षे जुनं विष्णू मंदिर चर्चेत
इराण- इस्रायल- अमेरिका युद्धभूमीच्या पार्श्वभूमीवर भारत आणि इराणचा सांस्कृतिक बंध दर्शवणार्या अनेक गोष्टी चर्चेत आल्या आहेत. इतिहास, खाद्यसंस्कृती, व्यापार, धार्मिक समजुती अशा सर्वच पार्श्वभूमीवर हा ऋणांनुबंध दृष्टीपथास पडतो. असाच एक घट्ट संबंध दर्शवणारा व्हिडिओ आणि फोटो बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.