इन्स्टाग्राम स्टोरी, बंद घर आणि २२ वर्षीय तरुणीची हत्या, पोलिसांनी कसं उलगडलं गूढ?
बंगळुरुतील २२ वर्षीय भवानी एस हिचा मृतदेह तिच्या घरात आढळला. तिचे रिक्षा चालक प्रियकर चंद्रशेखर चंदूने तिची हत्या करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. भवानीने चंदूशी गुपचूप लग्न केले होते, परंतु तिच्या कुटुंबाने दुसऱ्या मुलाशी लग्न ठरवले होते. यामुळे चंदूने तिला मारले. पोलिसांनी चंदूला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.