कलम ३७० ते नोटबंदी! सरन्यायाधीश बी. आर. गवईंनी आत्तापर्यंत घेतलेले ऐतिहासिक निर्णय कुठले?
भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायाधीश बी. आर. गवई यांनी बुधवारी शपथ घेतली. त्यांनी कलम ३७० हटवणे, इलेक्टोरल बॉन्ड योजना रद्द करणे आणि नोटाबंदी यांसारख्या महत्त्वपूर्ण निर्णयांमध्ये भूमिका बजावली आहे. सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटले निकाली काढणे आणि वक्फ (सुधारणा) अधिनियम, २०२५ सारख्या मुद्द्यांवर सुनावणी करणे ही त्यांच्यासमोरील मोठी जबाबदारी आहे.