“…म्हणून केजरीवालांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यासाठी दोन दिवस मागितले”, भाजपाचा आरोप
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तिहार तुरुंगातून जामिनावर बाहेर आल्यानंतर, केंद्रातील मोदी सरकारवर टीका करत आहेत. १५ सप्टेंबर रोजी त्यांनी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली. भाजपाने यावर प्रतिक्रिया देत, केजरीवाल दोन दिवसांत त्यांच्या पत्नीला मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेणार असल्याचे म्हटले आहे.