मोहन भागवतांच्या हिंदू-मुस्लीम ऐक्याच्या विधानावर असदुद्दीन ओवैसींचा पलटवार; म्हणाले…
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी न्यूयॉर्कमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्याबाबत विधान केले. त्यांनी म्हटले की, "भारतात मुस्लिमांना स्थान नाही असे मानणारा व्यक्ती हिंदू असूच शकत नाही." यावर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली. ओवैसी म्हणाले की, संघाची हिंदू-मुस्लिम ऐक्याची भाषा ही जुनी खेळी आहे. त्यांनी संघाच्या विचारसरणीवर आणि अल्पसंख्याकांविरोधातील भूमिकांवर गंभीर आक्षेप नोंदवले.