‘देशात गोंधळाची परिस्थिती, सगळीकडे घोटाळे’, योगगुरू बाबा रामदेव सरकारवर संतापले
योगगुरू बाबा रामदेव यांनी देशातील शिक्षण व्यवस्थेतील गोंधळावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांना शाळांमध्ये शिक्षक, पाणी, वीज, शौचालय अशा मूलभूत सुविधा नाहीत. परीक्षांमध्ये गैरव्यवहार होत आहेत. व्यवस्थेत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांशी प्रेमाने वागावे, असेही ते म्हणाले. जेन-झींचे कौतुक करताना काही मुलांच्या चुकीच्या वर्तनावरही त्यांनी टीका केली.