पाकिस्तानमध्ये ‘बीएलए’चा मोठा हल्ला; २५ सैनिक ठार; बलुच बंडखोरांनी व्हिडीओ केला जारी
पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बीएलए) दोन हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या २५ जवानांना ठार केल्याचा दावा केला आहे. बीएलएने जारी केलेल्या व्हिडिओत स्फोट आणि गोळीबाराचे दृश्य दिसत आहेत. या हल्ल्यांमुळे बलुचिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. पाकिस्तानने या हल्ल्यांबाबत कोणताही अधिकृत तपशील जाहीर केलेला नाही.