प्राध्यापकाची विद्यार्थिनीला लग्नाची मागणी; संतापलेल्या विद्यार्थ्यांनी चपलांनी झोडपलं
कर्नाटकातील बंगळूरु येथील एका वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापकाने भर वर्गात विद्यार्थिनीला लग्नाची मागणी घातल्याने विद्यार्थ्यांनी संतापून त्याला चपलांनी मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी चौकशी सुरू केली असून महाविद्यालय प्रशासनाने प्राध्यापकावर कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा आणि शैक्षणिक संस्थांमधील नैतिकतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.