बेल्जियम बांधतंय आठ फूटबॉल मैदानाच्या आकाराएवढं कृत्रिम बेट
बेल्जियमने उत्तरेतील समुद्रात जगातील पहिले कृत्रिम बेट तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. ४५ किमी अंतरावर असलेल्या या बेटाचे नाव 'प्रिंसेस एलिझाबेथ बेट' असेल. २२ हजार टन वजनाचे २३ काँक्रिटचे ठोकळे वापरून हे बेट तयार केले जाईल. पवन ऊर्जा निर्मितीसाठी हे बेट वापरले जाईल. प्रकल्पाचा खर्च ७ अब्ज युरो असून, २०३० पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.