वर्गात मुस्लीम विद्यार्थ्याला म्हटलं ‘दहशतवादी’; पीईएस विद्यापीठाच्या प्राध्यापकाचे निलंबन
बंगळुरूच्या पीईएस विद्यापीठात प्राध्यापक मुरलीधर देशपांडे यांनी मुस्लीम विद्यार्थ्याला 'दहशतवादी' म्हटल्याने वाद निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांनी हा व्हिडीओ चित्रीत करून व्हायरल केला. विद्यापीठाने प्राध्यापकांना निलंबित केले असून, घटनेची चौकशी सुरू केली आहे. काँग्रेस विद्यार्थी संघटनेने कारवाईची मागणी केली आहे. विद्यापीठाचे कुलपती जवाहर दोरेस्वामी यांनी व्हिडीओची सत्यता पडताळण्याचे आश्वासन दिले आहे.