नितीश कुमार यांच्या पहिल्या मंत्रिमंडळाची यादी आली समोर; भाजपाला १४ मंत्रीपदं, तर जदयूला…
बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये एनडीएला मोठा विजय मिळाल्यानंतर, नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये २६ मंत्र्यांनी शपथ घेतली. भाजपाला १४, जदयूला ८, लोजपला २, हिंदुस्थानी आवाम मोर्चाला १ आणि राष्ट्रीय लोक मोर्चाला १ मंत्रीपद मिळाले. भाजपाने समसमान सत्तावाटपाचा फॉर्म्युला प्रस्तावित केला होता, परंतु पहिल्या मंत्रिमंडळात तो दिसला नाही. एनडीएला २०२ जागा मिळाल्या, तर विरोधकांना ३५ जागा मिळाल्या.