“निवडणुकीत गैरप्रकार झाले, पण…”, बिहारच्या पराभवानंतर प्रशांत किशोर यांचे मोठे विधान
राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाचा बिहार विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाला. अनेक उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. प्रशांत किशोर यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत निवडणुकीत गडबड झाल्याचा दावा केला. त्यांनी सांगितले की, जनतेचा प्रतिसाद चांगला होता, पण निकाल अपेक्षाभंग करणारे ठरले.