जुना मित्रपक्ष भाजपापासून अंतर का राखतोय? BJD च्या बदलत्या भूमिकेचा अर्थ काय?
बीजू जनता दलाने (BJD) आपली तटस्थ भूमिका बदलण्याचे संकेत दिले आहेत. निवडणूक प्रक्रियेतील अनियमिततेच्या मुद्द्यावरुन त्यांचे भाजपासोबतचे संबंध ताणले गेले. आता निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीच्या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतल्याने ते भाजपाशी फारकत घेणार असल्याची चर्चा रंगली आहे.