३० मुस्लिम मतदारांची नावे वगळण्याचा प्रयत्न; भाजपाच्या बीएलए विरोधात गुन्हा दाखल
हैदराबादमधील मुशिराबाद विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या प्रतिनिधी एस. बालचंदर यांनी मुस्लिम समाजाच्या ३० मतदारांची नावे वगळण्यासाठी बनावट 'फॉर्म-७' सादर केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे राजकीय वातावरण तापले असून, एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांनीही आरोप केले आहेत. भाजपाने हे आरोप फेटाळले आहेत. तेलंगणात १५ जूनपासून विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम सुरू आहे.