“गद्दारीच्या किताबाचे खरे मानकरी नेहरू-गांधी कुटुंबच”; फाळणीवरून भाजपा खासदाराची टीका
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेस आणि नेहरू-गांधी कुटुंबावर फाळणी आणि काश्मीर समस्येसाठी जबाबदार असल्याचा आरोप केला. त्यांनी नेहरूंवर लेडी माऊंटबॅटन यांच्या प्रेमात अंध होऊन फाळणीची पाळेमुळे रोवली असल्याचा आरोप केला. दुबेंनी शिमला करारावरही टीका केली आणि नेहरू-गांधी कुटुंबाला गद्दारी आणि देशद्रोहाचे खरे मानकरी ठरवले.