“बिश्नोई समाजाची माफी मागा”, सलमान खानला भाजपा नेत्याचा सल्ला
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबरला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बिष्णोई गँगने फेसबुकवर पोस्ट करून जबाबदारी घेतली. यानंतर सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट्सच्या बाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली. भाजपा नेते हरनाथ सिंह यादव यांनी सलमान खानने बिष्णोई समाजाची माफी मागावी, असा सल्ला दिला. सलमानच्या घरावर पूर्वीही गोळीबार झाला होता, त्यामुळे त्याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.