BRICS ब्रिक्स परिषदेतून भारत-चीन संबंधांची पुढची वाटचाल ठरणार?
२०२० मधील पूर्व लडाख सीमावादानंतर भारत आणि चीनमधील संबंध कमालीच्या ताणतणावातून गेले. आता शी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील अविश्वासाची दरी मिटून राजनैतिक संबंध पुन्हा सुरळीत होतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अमेरिकेचे व्यापारी निर्बंध, पश्चिम आशियातील तणाव आणि जागतिक अर्थव्यवस्थेपुढील आव्हानांच्या पार्श्वभूमीवर यंदाची ब्रिक्स परिषद भारत-चीन संबंधांसाठी आणि जागतिक समीकरणांसाठी निर्णायक ठरणार आहे.