डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर चालणार का युद्धगुन्ह्यांचा खटला?
अमेरिकेने इराणच्या नागरी पायाभूत सुविधांवर बॉम्बफेक केल्यावरून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जगभरातून टीका झाली. मात्र, या टीकेकडे दुर्लक्ष करत त्यांनी इराणवरच युद्धाचे खापर फोडले. मात्र, नेतृत्वाला लक्ष्य करणे वेगळे आणि नागरी सुविधांवर हल्ला करणे वेगळे. यामुळे ट्रम्प यांच्यावर युद्धगुन्ह्यांसाठी खटला भरला जावा अशी मागणी जोर धरते आहे.