ट्रम्प इराणच्या विरोधात अणुबॉम्बचा वापर करणार? ‘त्या’ विधानामुळं चिंता वाढली
डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथवरील पोस्टमधून इराणला धमकी दिली की, "आज रात्री इराणची संपूर्ण संस्कृती नष्ट होईल." इराणला दिलेली ४८ तासांची मुदत संपत आली असून, इराणने माघार घेतली नाही तर मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल. उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनीही इराणला इशारा दिला की, अमेरिकेकडे अद्याप न वापरलेली हत्यारे आहेत.