भारतीय सुरक्षा दलांचे नेतृत्व कोणाकडे? CAPF विरुद्ध IPS वाद आता थेट संसदेत
CAPF विरुद्ध IPS वाद आणि २०२६ सामान्य प्रशासन विधेयकाचे परिणाम: CAPF अधिकारी अनेक वर्षे देशाच्या सुरक्षेसाठी काम करतात, परंतु बढती मिळण्यात IPS अधिकाऱ्यांचे वर्चस्व आहे. IPS अधिकाऱ्यांना राज्य आणि केंद्रात काम करण्याचा अनुभव असल्याने सरकार त्यांना वरिष्ठ पदांवर नियुक्त करते. CAPF अधिकाऱ्यांना नेतृत्वात संधी मिळावी, अशी मागणी आहे. २०२६ च्या ताज्या विधेयक IPS अधिकाऱ्यांसाठी कोटा राखून ठेवला आहे, त्याचा परिणाम इतर केंद्रीय सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांच्या मनोबलावर होण्याची शक्यता अधिक आहे.