chennai based firm gifted cars to employees
1 / 31

बॉस असावा तर असा! ‘या’ कंपनीने दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना भेट दिली मर्सिडीज बेन्झ

चेन्नईतील एका कंपनीने दिवाळीपूर्वी त्यांच्या कर्मचाऱ्यांना चक्क कार आणि बाईक भेट म्हणून दिली आहे. 'टीम डिटेलिंग सोल्युशन्स' असं या कंपनीचे नाव आहे. ही कंपनी स्टील डिझाइन क्षेत्रात काम करते. महत्त्वाचे म्हणजे कंपनीने कर्मचाऱ्यांना भेट म्हणून दिलेल्या कारमध्ये ह्युंदाई, टाटा, मारुती, सुझुकी आणि मर्सिडीज बेंझ या कंपन्यांच्या गाड्यांचा समावेश आहे. कंपनीच्या निर्णयानंतर आता समाज माध्यमांवर याची जोरदार चर्चा सुरू आहे.

Swipe up for next shorts
Uddhav Thackeray News Update News
2 / 31

उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना म्हणाले, “अहो देवाभाऊ, मुंब्र्याच्या वेशीवर..”

इंडिया आघाडीची प्रचारसभा बीकेसी येथे पार पडली. उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी, नाना पटोले, मल्लिकार्जुन खरगे यांनी भाषणं केली. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवरायांचं मंदिर बांधण्याच्या आव्हानावरून टीका केली. त्यांनी महाविकास आघाडीचं सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला. तसंच शिवरायांचं नाव ऐकलं की फडणवीसांच्या अंगाची लाही होते. मला आव्हान देण्याआधी त्यांनी जरा मुंब्र्याच्या वेशीवर जाऊन बघावं असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

Swipe up for next shorts
BJP Candidate List for Maharashtra Vidhan Sabha Election 2024
3 / 31

भाजपाकडून १४८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर!

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी भाजपाने त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. राज्यातील 288 जागांसाठी 4140 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 7995 अर्जांपैकी 7078 उमेदवार पात्र ठरले, तर 2938 उमेदवारांनी माघार घेतली. भाजपाच्या यादीत देवेंद्र फडणवीस (नागपूर दक्षिण पश्चिम), गिरीश महाजन (जामनेर), आणि आशिष शेलार (वांद्रे पश्चिम) यांसारख्या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.

Swipe up for next shorts
Why aai kuthe kay karte fame rupali bhosale bought a new car
4 / 31

रुपाली भोसलेने ‘या’ व्यक्तीसाठी खरेदी केली गाडी, म्हणाली, “गाडी माझी नसून…”

गेल्या पाच वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी ‘आई कुठे काय करते’ मालिका लवकरच बंद होणार आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक असलेली ‘आई कुठे काय करते’ सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. या मालिकेतील संजना म्हणजे अभिनेत्री रुपाली भोसलेने दिवाळीच्या मुहूर्तावर आलिशान गाडी खरेदी केली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. पण, रुपालीने ही आलिशान गाडी स्वतःसाठी नाही तर एका व्यक्तीसाठी घेतली आहे.

NCP Clock
5 / 31

ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून पक्षचिन्हाबाबत अजित पवारांना ३६ तासांचा अल्टिमेटम!

राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. वर्षभरापूर्वी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बंडखोरी करून ४० आमदारांसह भाजपाबरोबर महायुतीत सामील झाले. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी अजित पवारांविरोधात पक्षचिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने अजित पवारांना ३६ तासांत खुलासा करणारे निवेदन छापण्याचा अल्टिमेटम दिला आहे.

Donald Trump Won US Presidential Election 2024
6 / 31

दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या 2024 निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले असून ते दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होणार आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस पराभूत झाल्या आहेत. विजयानंतर ट्रम्प यांनी अमेरिकन नागरिकांचे आभार मानले आणि देशाच्या समस्यांवर उपाय करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी बेकायदा स्थलांतर, सुरक्षित सीमा आणि समर्थ लष्कर यावर भर दिला. ट्रम्प यांनी अमेरिकेला पुन्हा महान बनवण्याची संधी मिळाल्याचे सांगितले.

MNS Hingana
7 / 31

उमेदवार असतानाही भाजपाच्या उमेदवाराला मनसेचा जाहीर पाठिंबा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि भाजपामध्ये काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होत आहे. हिंगणा विधानसभा मतदारसंघात मनसेने भाजपाच्या उमेदवार समीर मोघे यांना पाठिंबा दिला आहे. मनसेने बिजाराम किनकर यांना उमेदवारी दिली होती, परंतु प्रशासकीय अडचणींमुळे उमेदवारी मागे घेता आली नाही. त्यामुळे मनसेने या मतदारसंघात प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Bigg Boss 18 Chahat Pandey, Sarah Khan, Arfeen Khan, Tanjindar bagga nominated
8 / 31

विवियन डिसेनामुळे ‘या’ चार सदस्यांवर घराबाहेर जाण्यासाठी टांगती तलवार, कोण नॉमिनेट झालं?

सध्या ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा पाचवा आठवडा सुरू आहे. नुकतीच पाचव्या आठवड्यातील नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली. या नॉमिनेशन प्रक्रियेत ‘बिग बॉस’ने सदस्यांना नॉमिनेट करण्याचे संपूर्ण अधिकार टाइम गॉड म्हणजेच विवियन डिसेनाला दिले. नॉमिनेशन प्रक्रियेची जंगली ऑक्टोपसची थीम होती. या जंगली ऑक्टोपसची भूक शांत करण्यासाठी विवियनला आठ सदस्यांची बळी चढवायची होती. यावेळी विवियन पूर्णपणे पक्षपाती खेळला. त्याने आपल्या ग्रुपमधील आणि फेव्हरट सदस्यांना नॉमिनेट होण्यापासून सुरक्षित ठेवलं.

Narendra Modi reaction on Donald Trump
9 / 31

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. मोदी म्हणाले, "माझ्या मित्र डोनाल्ड ट्रम्प यांचे ऐतिहासिक विजयाबद्दल मनापासून अभिनंदन. तुमच्या मागील कार्यकाळातील यशस्वी कामगिरीवर आधारित, भारत-अमेरिका व्यापक जागतिक आणि धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी मी उत्सुक आहे. आपल्या लोकांच्या भल्यासाठी आणि जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी एकत्रितपणे काम करूया."

US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
10 / 31

अमेरिकेच्या निवडणुकीत सहा भारतीयांची बाजी; मराठमोळा आमदारही दुसऱ्यांदा विजयी!

अमेरिकेच्या 2024 निवडणुकीत सहा भारतीय अमेरिकन नेते स्टेट रिप्रेझेन्टेटिव्ह म्हणून निवडून आले आहेत. यात मराठमोळे श्री ठाणेदार सलग दुसऱ्यांदा विजयी झाले. सुहास सुब्रमण्यम व्हर्जिनियातून पहिल्यांदा निवडून आले. काँग्रेसमधील 'समोसा कॉकस'मध्ये आता सहा भारतीय अमेरिकन सदस्य आहेत. डॉ. अमिश शाह यांच्या विजयाने ही संख्या सात होण्याची शक्यता आहे. राजा कृष्णमूर्ती, रो खन्ना, प्रमिला जयपाल, आणि अमी बेरा हेही पुन्हा निवडून आले आहेत.

Dilip Prabhavalkar Drama News
11 / 31

अभिनेते दिलीप प्रभावळकर करिअरमध्ये पहिल्यांदा करणार अनोखा प्रयोग

अष्टपैलू रंगकर्मी दिलीप प्रभावळकर पहिल्यांदाच रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये 'पत्रापत्री' या अभिवाचनाचा प्रयोग करणार आहेत. ९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या प्रयोगासाठी ते खूप उत्सुक आहेत. 'पत्रापत्री'मध्ये पाच पत्रांचे अभिवाचन आहे, ज्यात प्रासंगिक आणि विडंबनात्मक पत्रांचा समावेश आहे. विजय केंकरे दिग्दर्शित या प्रयोगात प्रभावळकर आणि केंकरे यांनी एकत्र काम केले आहे. वाचन संस्कृतीला महत्त्व देणारा हा प्रयोग प्रेक्षकांना नवा अनुभव देईल.

Donald Trump Won US Presidential Election 2024
12 / 31

US Election: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा डोनाल्ड ट्रम्प, कमला हॅरीस पराभूत!

गेल्या महिन्याभरात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची जोरदार चर्चा झाली. भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी संध्याकाळी मतदानाला सुरुवात होऊन बुघवारी पहाटे मतमोजणी झाली. रिपब्लिकन पक्षाला बहुमत मिळाल्याने डोनाल्ड ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्ष होणार आहेत. ओहियोमध्ये शेरॉड ब्राऊन यांचा बर्नी मोरेनो यांनी पराभव केला. विस्कॉन्सिन, पेनसिल्वानिया आणि मिशिगनमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाने कडवी झुंज दिली.

US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
13 / 31

कमला हॅरीस यांनी पराभव स्वीकारला? रात्रीचं भाषण रद्द; प्रचारक म्हणतात…

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध कमला हॅरिस यांच्यातील अटीतटीच्या लढतीत डोनाल्ड ट्रम्प २४६ मतांनी आघाडीवर आहेत, तर कमला हॅरिस यांना १८२ मते मिळाली आहेत. निकाल स्पष्ट होत असल्याने कमला हॅरिस यांनी रात्रीची सभा रद्द केली आहे. त्यांच्या सल्लागारांनी सांगितले की, अद्याप अनेक मतांची मोजणी बाकी असल्याने त्या इलेक्शन नाईटमध्ये बोलणार नाहीत.

Aai kuthe kay karte fame madhurani prabhulakar got emotional sharing her old memories of the serial
14 / 31

‘आई कुठे काय करते’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, अरुंधती झाली भावुक; म्हणाली…

'आई कुठे काय करते' ही लोकप्रिय मराठी मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. २०१९पासून सुरू झालेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं. अरुंधतीची भूमिका साकारणारी मधुराणी प्रभुलकर महाराष्ट्राची लाडकी आई ठरली. मात्र, सातत्याने बदलणारे ट्रॅक प्रेक्षकांना रटाळ वाटू लागले, त्यामुळे मालिकेची वेळ बदलली आणि आता ती बंद होणार आहे. मधुराणीने या प्रवासाबद्दल भावुक प्रतिक्रिया दिली.

Devendra Fadnavis on Rahul Gandhi
15 / 31

“राहुल गांधी लाल संविधान दाखवून कोणाला इशारा देताय?”, देवेंद्र फडणवीसांचा रोखठोक सवाल!

राहुल गांधी यांच्या भारत जोडो आंदोलनावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी लाल रंगाचं संविधानाचं पुस्तक घेऊन फिरत आहेत, ज्यामुळे अराजकता पसरवणाऱ्या लोकांना प्रोत्साहन मिळत आहे. त्यांनी दावा केला की, या आंदोलनामुळे देशाच्या एकतेला धोका निर्माण होईल आणि अर्बन नक्षलवादाला प्रोत्साहन मिळेल.

shani dev margi 2024 today horoscope
16 / 31

१५ नोव्हेंबरनंतर शनिदेव ‘या’ राशींवर करणार धन अन् सुखाची बरसात;

देवगुरु गुरु आणि राक्षसांचे गुरु शुक्र एका ठराविक काळानंतर राशी बदल करतात, ज्याचा निश्चितपणे प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रभाव पडतो. या वर्षी गुरु फक्त वृषभ राशीत असेल, तर शुक्र दर २६ दिवसांनी आपली राशी बदल करतो. अशात ७ नोव्हेंबरला शुक्र धनु राशीत प्रवेश करेल. शुक्राचा गुरुच्या राशीत प्रवेश झाल्यामुळे आणि गुरु शुक्राच्या वृषभ राशीत असल्यामुळे परिवर्तन राजयोग तयार होत आहे. अशा स्थितीत दोन्ही ग्रह काही राशींच्या लोकांचे भाग्य उजळवू शकतात.

When Aishwarya Rai Bachchan shared her tips for glowing skin
17 / 31

वयाच्या पन्नाशीतही तजेलदार त्वचा असणाऱ्या ऐश्वर्या रायच्या सौंदर्याचे काय आहे रहस्य?

अनेक तरुणी मुली पुरळ, कोरडी किंवा तेलकट त्वचा अशा कित्येक समस्यांचा सामना करतात, पण अभिनेत्री ऐश्वर्या रायची त्वचा वयाच्या पन्नाशीमध्येही तितकीच उजळ आणि तजेलदार दिसत आहे. एक सुप्रसिद्ध बॉलीवूड सेलिब्रिटी म्हणून ती बऱ्याचदा चर्चेत असते; परंतु तिच्या स्किनकेअरमुळे सध्या ती चर्चेत आली आहे. २०२४ मध्ये Harper’s Bazaar UK ला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्याने तिची सुव्यवस्थित दैनंदिन दिनचर्या (streamlined daily routine) शेअर केली आहे, ज्यानुसार ती भरपूर पाणी पिणे (हायड्रेशन) स्वच्छता आणि आराम यांना प्राधान्य देते.

Madhureema Raje Chhatrapati
18 / 31

“…म्हणून मधुरिमाराजे यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे”, अखेर शाहू छत्रपतींनी सोडलं मौन

कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील उमेदवारीवरून महाविकास आघाडीत गोंधळ झाला. मधुरिमाराजे छत्रपती यांनी उमेदवारी मागे घेतल्याने काँग्रेसला मानहानी सहन करावी लागली. शाहू छत्रपती यांनी स्पष्ट केले की, सामान्य कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी उमेदवारी मागे घेतली. राजेश लाटकर यांना पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. सतेज पाटील यांच्याशी कोणताही वाद नसल्याचेही त्यांनी सांगितले.

What Raj Thackeray Said About Sharad Pawar
19 / 31

“आमच्याकडे शरद पवार नावाचे संत जन्माला आले त्यांनी जातीपातींमध्ये..”, राज ठाकरेंची टीका

राज ठाकरे यांनी यवतमाळच्या राळेगाव येथे सभा घेतली. त्यांनी महाराष्ट्राच्या विकास आराखड्याबद्दल मनसे हा पहिला पक्ष असल्याचे सांगितले. शरद पवारांना जातीपातींमध्ये द्वेष पसरवणारे संत म्हणत टीका केली. लाडकी बहीण योजनेवरही टीका करत, फुकट गोष्टी न देता काम देण्याचे आश्वासन दिले. मतदान प्रक्रियेचे महत्त्व सांगत, अशोक मेश्राम यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

Underrated Thriller Movies on OTT
20 / 31

डोकं चक्रावणारे ट्विस्ट असलेले ‘हे’ चित्रपट आहेत OTT वर, वाचा यादी

ओटीटी November 6, 2024

भारतात अनेक थ्रिलर चित्रपट बनतात, परंतु काहींना तेवढी लोकप्रियता मिळत नाही. 'रात अकेली है', 'मोनिका, ओ माय डार्लिंग', 'दृश्यम 2', 'सी यू सून', 'जॉनी गद्दार' आणि 'कप्पेला' हे असेच काही चित्रपट आहेत. हे चित्रपट नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहेत. या चित्रपटांमध्ये अनेक ट्विस्ट आहेत आणि त्यांना आयएमडीबीवर चांगले रेटिंग मिळाले आहे.

maharashtra assembly election 2024
21 / 31

काँग्रेस अखेर शंभरीपार, अर्जमाघारीनंतर सर्वच पक्षांची अंतिम आकडेवारी आली समोर; वाचा…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान १५ दिवसांवर आले आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात मुख्य लढत होणार आहे. सत्ताधारी महायुतीने विविध योजना जाहीर केल्यामुळे त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे, तर लोकसभा निकाल विरोधकांसाठी सकारात्मक ठरू शकतो. पक्षफुटीमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाले आहेत. महाविकास आघाडीने काँग्रेसला १०१, शिवसेना (उद्धव) ९२, राष्ट्रवादी (शरद) ८७ जागा दिल्या आहेत. महायुतीत भाजप १४८, शिवसेना (शिंदे) ८५, राष्ट्रवादी (अजित) ५४ जागांवर लढणार आहेत.

Sunil Tatkare Mahayuti
22 / 31

“सुनील तटकरे महायुतीला लागलेला कॅन्सर”, शिंदे गटाच्या आमदाराची बोचरी टीका

रायगड जिल्ह्यातील महायुतीत जागावाटपावरून वाद झाला आहे. कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातून महेंद्र थोरवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, परंतु त्यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांना सुनील तटकरेंचं पाठबळ असल्याचा दावा थोरवे यांनी केला आहे. थोरवे यांनी सुनील तटकरे महायुतीला धोका देत असल्याचा आरोप केला आहे आणि तटकरे यांना महायुतीला लागलेला कॅन्सर म्हटले आहे.

Bollywood Actors Salman Khan ex-girlfriend Somy Ali claimed that Sushant Singh Rajput was murdered
23 / 31

“सुशांतची हत्याच केली”, सलमानच्या एक्स गर्लफ्रेंड दावा; म्हणाली, “एम्सच्या डॉक्टरांनी…”

बॉलीवूड November 5, 2024

सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. सलमान खान संबंधित सातत्याने सोमी विधान करताना दिसत आहे. तसंच काही धक्कादायक खुलासे करत आहे. अशातच आता सोमी अलीने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतविषयी विधान केलं आहे. त्यामुळे सोमी अली पुन्हा एकदा अधिकच चर्चेत आली आहे.

Bigg Boss 18 Rupali Bhosle fire on Vivian dsena
24 / 31

रुपाली भोसले भडकली ‘बिग बॉस १८’मधील ‘या’ सदस्यावर; सिद्धार्थ शुक्लाचा उल्लेख करत म्हणाली..

अभिनेत्री रुपाली भोसलेने नुकतीच इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने ‘बिग बॉस’च्या १३व्या पर्वाचा विजेता दिवंगत सिद्धार्थ शुक्लाचा उल्लेख केला आहे आणि 'बिग बॉस १८'मधील एका सदस्यावर टीका केली आहे. रुपालीच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

Bhau Kadam AJit Pawar
25 / 31

चला हवा येऊ द्या फेम अभिनेता करणार अजित पवारांचा प्रचार, लाडकी बहीण योजनेविषयी म्हणाला…

निवडणुकीच्या प्रचारासाठी भाऊ कदम राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा स्टार प्रचारक म्हणून काम करणार आहेत. अजित पवारांनी कलाकारांच्या समस्यांवर लक्ष दिल्यामुळे भाऊ कदम त्यांचा प्रचार करणार आहेत. भाऊ कदम यांनी अजित पवारांची भेट घेतली आणि त्यांच्या कामाची प्रशंसा केली. त्यांनी अद्याप पक्षप्रवेश केलेला नसला तरी प्रचारात सहभागी होणार आहेत. सुनील तटकरे आणि सिद्धार्थ कांबळे प्रचाराचे नियोजन करतील.

Somy Ali on salman khan aishwarya rai relation
26 / 31

“ती सलमानबरोबर असताना…”, भाईजानच्या एक्स गर्लफ्रेंडने ऐश्वर्या रायबद्दल केलं मोठं वक्तव्य

बॉलीवूड November 5, 2024

अभिनेता सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून पुन्हा जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. हैदराबादमध्ये 'सिंकदर' चित्रपटाचं शूटिंग करत असताना, त्याची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने त्याच्याबरोबरच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. तिने सलमानच्या 'वन नाईट स्टँड' आणि शारीरिक अत्याचाराबद्दल सांगितलं. सोमीने सलमानच्या बेवफाईमुळे नातं संपवलं आणि ऐश्वर्या रायबद्दलही भाष्य केलं. तिने लॉरेन्स बिश्नोईला बॉलीवूडचा दाऊद म्हटलं.

Bigg Boss 18 rajat dalal shayari on Vivian dsena group watch video
27 / 31

रजत दलालने शायरीतून विवियन डिसेनाच्या ग्रुपला लगावला टोला; नेटकरी म्हणाले, “एक नंबर भाई…”

Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात दोन वाइल्ड कार्ड सदस्यांची एन्ट्री झाल्यापासून घरातील वातावरण बदललं आहे. दिग्विजय सिंह राठी आणि कशिश कपूर हे दोघं वाइल्ड कार्ड म्हणून ‘बिग बॉस’च्या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. सध्या दोघं घरातील सगळ्या सदस्यांबरोबर चर्चा करत आहेत. कोणत्याही ग्रुपमध्ये सामील झालेले नाहीत. पण, सध्या विवियन डिसेनाच्या ग्रुपची खूप चर्चा सुरू आहे.

Uddhav thackeray Manifesto
28 / 31

सुरतमध्ये महाराजांचं मंदिर, मुलांना मोफत शिक्षण अन्; ठाकरेंनी कोणी वचने दिली?

राज्यात मुलींना मोफत उच्चशिक्षणाची सोय आहे. आता राज्यातील मुलांनाही मोफत शिक्षण देण्याचं वचन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. ते राधानगरी – भुदरगड मतदारसंघात के. पी. पाटील यांच्या प्रचारार्थ बोलत होते. मुलगा आणि मुलगी दोघेही महाराष्ट्राचे आधारस्तंभ आहेत, असं त्यांनी सांगितलं. तसेच, सुरतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार आणि महिला पोलिसांच्या रिक्त पदांची भरती करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.

Indias most expensive film flopped after row over same sex kiss
29 / 31

दोन अभिनेत्रींमधील किसिंग सीनमुळे वाद, ८०च्या दशकात १० कोटींचे बजेट असून ठरला फ्लॉप

बॉलीवूड November 5, 2024

१९८३ मध्ये रिलीज झालेला 'रझिया सुलतान' हा कमाल अमरोही यांचा चित्रपट होता. १० कोटींच्या बजेटमुळे तो तेव्हाचा सर्वात महागडा चित्रपट होता. हेमा मालिनी, धर्मेंद्र, परवीन बाबी यांसारखे कलाकार असूनही चित्रपट फ्लॉप ठरला. समलिंगी किसिंग सीनमुळे वाद निर्माण झाला. अमरोही यांनी कर्ज घेऊन चित्रपट बनवला, पण फ्लॉप झाल्याने आर्थिक फटका बसला. १९९३ मध्ये अमरोही यांचे निधन झाले आणि 'रझिया सुलतान' त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.

Marathi actress vishakha subhedar these post viral
30 / 31

विशाखा सुभेदारने माहेरपणाबद्दल लिहिलेल्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली, “बहिणीच्या उवा…”

नाटक, मालिका, चित्रपट या तीनही माध्यमांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने आणि विनोदी शैलीने अढळ स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार. ‘फुबाईफू’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली विशाखा सुभेदार सध्या मालिका आणि चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिकेत पाहायला मिळत आहे. नुकतीच विशाखाने माहेरपणाविषयी सुंदर पोस्ट लिहिली आहे; जी सध्या व्हायरल होतं आहे.

sharad pawar retirement (1)
31 / 31

Video: शरद पवारांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत, राज्यसभेतही जाणार नाही? भाषणात म्हणाले…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी बारामतीत युगेंद्र पवारांच्या प्रचारसभेत राजकीय निवृत्तीचे संकेत दिले. त्यांनी ५५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेतला आणि पुढील पिढीला संधी देण्याची गरज व्यक्त केली. लोकसभा निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला असून, समाजकारण सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या निवृत्तीच्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.