जादूटोण्याचा संशय, तीन महिलांसह पाच जणांची बेदम मारहाण करून हत्या, आठवडाभरातील दुसरी घटना
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात रविवारी जादू-टोण्याच्या संशयातून दोन दाम्पत्यांसह एका महिलेची हत्या करण्यात आली. पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. मृतांमध्ये मौसम कन्ना, मौमस बिरी, मौसम बुच्चा, मौसम आरजू आणि काका लच्छी यांचा समावेश आहे. यापूर्वी जादू-टोण्याच्या संशयातून बलौदाबाजार-भाटपारा जिल्ह्यातही अशाच प्रकारे एका कुटुंबातील चार जणांची हत्या झाली होती.