आकाशात ड्रोनचे थवे, समुद्राखाली सेन्सर्स; चीनच्या ‘अॅटलस’ यंत्रणेमुळे भारताची चिंता वाढली
लडाखच्या दुर्गम पर्वतरांगांपासून ते हिंदी महासागराच्या अथांग सगरतळीपर्यंत चीनने आता 'इंटेलिजंट' युद्धाची तयारी पूर्ण केली आहे. चीनची 'अॅटलस' (Atlas) ही ड्रोन स्वॉर्म प्रणाली केवळ तांत्रिक प्रगती नाही, तर ती भारताच्या पारंपरिक संरक्षण भिंतीला छेद देणारी एक 'मशीन-लर्निंग' आधारित रणनीति आहे.