चीनमध्ये पितरांच्या पूजेवर व्हॅटिकनने बंदी का घातली होती? २५० वर्षांचा वाद काय होता?
मानवी संस्कृतीच्या इतिहासात जन्माइतकच मृत्यूनंतरच्या जगाला आणि पूर्वजांच्या स्मृतींना विशेष महत्त्व देण्यात येते. भारताप्रमाणे चीनमध्येही हजारो वर्षांपासून पितरांची पूजा करण्याची अतिशय समृद्ध परंपरा आहे. मात्र, या परंपरेवरून १७ व्या शतकात व्हॅटिकन चर्च आणि चिनी सम्राटांमध्ये तब्बल अडीचशे वर्षांचा मोठा संघर्ष उभा राहिला होता.