“NALSAR चं निमंत्रण स्वीकारलंच नव्हतं” सरन्यायाधीश सूर्य कांत यांचं स्पष्टीकरण!
भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी नालसर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचं निमंत्रण स्वीकारलंच नसल्याचं स्पष्ट केलं आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या उपस्थितीला विरोध केल्यानंतर बार कौन्सिल ऑफ इंडियाने हस्तक्षेप करत विद्यार्थ्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. मात्र, टीकेनंतर हे आदेश मागे घेतले. सर्वोच्च न्यायालयाने बार कौन्सिलच्या हस्तक्षेपावर प्रश्न उपस्थित केला आहे.