मोदींकडून पुन्हा ‘दिमागी नक्षल’चा उल्लेख, CJP चे सौरव दास आक्रमक
कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'दिमागी नक्षल' वक्तव्यावर टीका केली आहे. त्यांनी म्हटलं की, पंतप्रधानांनी तरुणांच्या प्रश्नांना उत्तरं देण्याऐवजी त्यांना हिणवलं आहे. दास यांनी शाळा बंद पडणे, बेरोजगारी आणि शिक्षणाच्या मुद्द्यांवर बोलण्याची गरज व्यक्त केली. मोदींनी SRCC मधील भाषणात 'दिमागी नक्षल'चं होमिओपॅथीच्या उदाहरणाने वर्णन केलं होतं.