वर्गातच दुसरीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू; आवाजामुळे मृत्यू झाल्याचा पालकांचा आरोप
उत्तर प्रदेशातील बलरामपूर येथे दुसरीत शिकणाऱ्या वैष्णवी तिवारी या मुलीचा डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे वर्गात मृत्यू झाला. गणेश विसर्जन मिरवणुकीतील डीजेच्या आवाजामुळे तिची प्रकृती बिघडली आणि ती कोसळली. रुग्णालयात दाखल केल्यावर तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ आणि संताप व्यक्त होत आहे. स्थानिकांनी शाळा, रुग्णालये आणि नागरी वस्त्यांजवळ डीजेच्या आवाजावर कठोर नियमांची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.