कॉक्रोच जनता पार्टीत फूट; ‘सीजेपी-डी’ नावाचा वेगळा गट स्थापन; अभिजीत दिपकेंवर गंभीर आरोप
भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या टिप्पणीनंतर स्थापन झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीला (सीजेपी) अल्पावधीतच यश मिळाले. नीट पेपरफुटीनंतरच्या आंदोलनामुळे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. मात्र, आता सीजेपीमध्ये बंडखोरी होऊन मनीष ब्रह्मभट यांनी 'सीजेपी-डी' नावाने वेगळा गट स्थापन केला आहे. ब्रह्मभट यांनी अभिजीत दिपके यांच्यावर 'केजरीवाल टीम' तयार केल्याचा आरोप केला.