काँग्रेस हायकमांडचा मोठा निर्णय; ६ राज्यांचे प्रभारी बदलले
काँग्रेस हायकमांडने संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल केले आहेत. आसाम, पंजाब, महाराष्ट्र, छत्तीसगड, गुजरात आणि आंध्र प्रदेश या राज्यांचे प्रभारी बदलले आहेत. सचिन पायलट यांची पंजाबचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर भूपेश बघेल यांना आसामची जबाबदारी देण्यात आली आहे. महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांची नियुक्ती झाली आहे.