“आंदोलन, प्रचाराला महिला हव्यात, पण…”, काँग्रेसच्या महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसच्या महिला नेत्या संगीता तिवारी यांनी पक्षनेतृत्त्वावर आणि पुणे शहर अध्यक्षांवर टीका करत काँग्रेस पक्ष सोडणार असल्याची जाहीर घोषणा केली आहे. पुण्यातील महिला काँग्रेस कार्यालय बंद केल्यावरून आणि त्याबाबत वारंवार तक्रार दाखल करूनही त्याची दखल न घेतल्याने संगीता तिवारी यांनी हा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं आहे. यावरून त्यांनी आता टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचं नाव घेत पक्ष सोडणार असल्याचं जाहीरपणे पुन्हा एकदा सांगितलं.