‘रेल्वेची ती एक सूचना आणि चेंगराचेंगरी झाली’, हमालाने सांगितला धक्कादायक प्रसंग
दिल्ली रेल्वे स्थानकावर महाकुंभमेळ्यात जाणाऱ्या भाविकांच्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. १५ फेब्रुवारी रोजी रात्री प्रयागराजला जाणाऱ्या रेल्वेने ऐनवेळी फलाट बदलल्याने प्रवाशांनी त्याठिकाणी धाव घेतली, ज्यामुळे १८ जणांचा मृत्यू झाला आणि १० हून अधिक जखमी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांनी याबद्दल शोक व्यक्त केला.