‘नावं बदलली तरी वास्तव बदलणार नाही’, अरुणाचल प्रदेशवरून चीनला भारताचं प्रत्युत्तर
चीनने अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे बदलण्याचा प्रयत्न केला आहे, ज्याचा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केले की, नावं बदलून वास्तव बदलणार नाही. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि नेहमीच राहणार. चीनच्या या कुरापतींना भारताने सडेतोड उत्तर दिले आहे.