एकेकाळी दिवसाला ५० रुपये कमावणारा सफाई कर्मचारी झाला फॉर्च्युनरचा मालक; दारू सोडली आणि…
कर्नाटकातील बिसरोडी येथील पालिका कर्मचारी शेषप्पा यांची प्रेरणादायी कहाणी सध्या चर्चेत आहे. १९९६ मध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम सुरू केलेल्या शेषप्पा यांना सुरुवातीला फक्त ५० रुपये मिळत होते. दारूच्या आहारी गेलेल्या शेषप्पा यांचे आयुष्य २००५ मध्ये बदलले. त्यांनी शेती आणि दुग्धव्यवसायातून समृद्धी मिळवली. आज फॉर्च्युनर गाडीचे मालक असूनही, ते रोज रस्त्यावर झाडू मारतात.