दिल्लीतही आता लाडकी बहीण योजना, अरविंद केजरीवाल देणार महिलांना दरमहा २१०० रुपये
दिल्ली लाडकी बहीण योजना: महाराष्ट्रात महायुतीला यश मिळाल्यानंतर, आम आदमी पक्षाने दिल्लीमध्ये लाडकी बहीण योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महिलांना प्रतिमहा २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. या योजनेसाठी नावनोंदणी उद्यापासून सुरू होणार आहे. केजरीवाल यांनी महिलांच्या आर्थिक मदतीसाठी हा प्रस्ताव मंजूर केला असून, आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तेवर आल्यास ही योजना लागू होईल.