भारतीय विवाहितेची लंडनमध्ये हत्या, सात महिन्यांपासून फरार नवऱ्याचा शोध सुरु
ऑगस्ट २०२३ मध्ये २४ वर्षीय मुलीचं लग्न झालं आणि ती नवऱ्यासह लंडनला गेली. ऑगस्ट २०२४ मध्ये तिला समजलं की नवरा नोकरी करत नाही. नोव्हेंबर २०२४ मध्ये तिचा मृतदेह नवऱ्याच्या कारमध्ये सापडला. तिच्या गळा दाबून हत्या करण्यात आली होती. नवरा मुख्य संशयित असून तो लंडन सोडून भारतात आला. दिल्ली पोलिसांनी हुंड्यासाठी हत्या केल्याचा आरोप केला. मार्च २०२५ मध्ये तिच्या सासू-सासऱ्यांना अटक झाली. पतीविरोधात लुक आऊट नोटीस जारी केली आहे.