होळी आणि दिवाळीला मोफत एलपीजी गॅस सिलिंडर मिळणार; दिल्ली सरकारची घोषणा
दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री रेखा गुप्ता यांनी २०२६ साठी १,०३,७०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. या बजेटमध्ये दिल्लीतील प्रत्येक कुटुंबाला होळी आणि दिवाळीला दोन मोफत एलपीजी सिलिंडर देण्याची घोषणा केली आहे. योजनेसाठी २६० कोटींची तरतूद आहे. पायाभूत सुविधा, जल व्यवस्थापन, रस्ते विकास, औद्योगिक क्षेत्र आणि अग्निशमन यंत्रणा बळकट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे.