दिल्लीत ५ मजली हॉस्टेलची इमारत कोसळली; अनेक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
दिल्लीतील सत्य निकेतन भागात रविवारी दुपारी पाच मजली निवासी इमारत कोसळून अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. दिल्ली अग्निशामक दल, एनडीआरएफ, आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून बचाव कार्य सुरू केले आहे. काही जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून, ढिगाऱ्याखाली अजूनही अनेक लोक अडकल्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी या दुर्घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.