डेटिंग ॲपवरची ‘ती’ भेट ठरली काळ! तरुणाला रात्रभर गाडीत डांबून ७ लाखांना लुटलं
दक्षिण-पूर्व दिल्ली पोलिसांनी सोशल मीडिया आणि डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणांना लुटणाऱ्या 'हनी ट्रॅप' टोळीचा पर्दाफाश केला आहे. नेहरू प्लेस येथून एका व्यक्तीचे अपहरण करून ७ लाख रुपये उकळल्याप्रकरणी हरलीन कौर उर्फ जेनी आणि तिच्या चार साथीदारांना अटक करण्यात आली आहे. हरलीन डेटिंग ॲपद्वारे तरुणांना आमिष दाखवून भेटायला बोलवायची आणि तिचे साथीदार दरोडा टाकत असत. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ आणि १४० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.