मोठी बातमी! जंतर-मंतरवर यापुढे आंदोलन करता येणार नाही, अधिकृत ठिकाणाच्या यादीतून नाव वगळलं; तीन नव्या जागा निश्चित
दिल्लीतील जंतर-मंतर येथे आता आंदोलने करता येणार नाहीत, कारण दिल्ली पोलिसांनी त्याची मान्यता रद्द केली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या शिफारशींनुसार, रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि सीबीडी मैदान ही तीन नवीन ठिकाणे आंदोलने करण्यासाठी निश्चित करण्यात आली आहेत. जंतर-मंतरवरील सुरक्षेची आणि वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच नवीन नियमावली जारी केली जाईल.