ISI आणि दाऊद इब्राहिमशी संबंधित ९ जणांना स्फोटकांसह अटक, मोठ्या हल्ल्याची योजना उधळली
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने शनिवारी पाकिस्तानच्या आयएसआय आणि मुंबई अंडरवर्ल्ड नेटवर्कसाठी काम करणाऱ्या नऊ हस्तकांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली. हे नेटवर्क दाऊद इब्राहिमशी निगडीत होते.