दिल्लीत मोठी दुर्घटना, ३ मजली इमारत कोसळली; अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरू
दिल्लीच्या सत्य निकेतन परिसरात रविवारी दुपारी एक तीन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे. घटनेनंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. अग्निशमन विभागाला 1:30 वाजता सूचना मिळाली. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.